आजीबाईंचा वर्कआऊट पाहून आनंद महिंद्रांना वाटली स्वतःची लाज

(Source)

महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या आनंद महिंद्रांनी शेअर केलेला एका आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक 72 वर्षीय आजीबाई वर्कआउट करत आहे. या आजीबाईंच्या वर्कआउटसमोर तरूण देखील लाजतील.

हा व्हिडीओ नंदी फाउंडेशनचे सीईओ मनोज कुमार यांनी 11 डिसेंबरला ट्विटरवर शेअर केला होता.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ री-ट्विट करत लिहिले की, मनोज, तुम्ही हा व्हिडीओ सकाळी सकाळी का शेअर केला ? मला स्वतः आळशी असल्यासारखे वाटत आहे. कदाचित ही एक किक आहे, ज्यामुळे आपण रोज व्यायाम ठाळण्यासाठी शोधत असलेली कारणे बंद केली पाहिजेत.

नेटकऱ्यांना देखील आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ खूपच आवडला. आतापर्यंत हा 80 हजारपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे. तर शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment