शाओमीने आणला ५ हजार किमी रेंजचा वॉकीटॉकी


चीनी कंपनी शाओमीने खास वॉकीटॉकीसाठी क्राउड फंडिंग केले असून बीबेस्ट या नावाने हा वॉकीटॉकी अतिशय खास फिचर्स सह सादर केला आहे. एखाद्या फिचर फोन प्रमाणे अतिशय कॉम्पॅक्ट आकारात असलेल्या या वॉकीटॉकीसाठी हिडन अँटेना दिली गेली आहे. त्याला वायफाय, फोरजी सेल्युलर कनेक्टिव्हीटी असून त्यात सिक्युरिटीसह एकाचवेळी अनेक डिव्हायसेस इंटरकनेक्ट करता येतात. विशेष म्हणजे त्याच्या इंटरकॉम फंक्शनची रेंज ५ हजार किमी आहे.

बीबेस्ट स्मार्ट वॉकीटॉकी आहे आणि त्याला सीमकार्ड स्लॉटही दिला गेला आहे. यात मल्टीपल कॉल मोड दिला गेला आहे त्यामुळे ग्रुप कम्युनिकेशन शिवाय खास दोस्त मंडळींबरोबर स्वतंत्र बातचीत करणे शक्य होणार आहे. इंटरकॉम फंक्शन वापरण्यासाठी एक स्वतंत्र बटण दिले गेले आहे. यात शाओमी एआय स्मार्ट असिस्टंस इन्स्टॉल केला गेला असल्याने त्याचा वापर हवामान जाणून घेणे, गाणी ऐकणे, बातम्या जाणून घेणे यासाठीही करता येणार आहे.

या वॉकीटॉकीला इनबिल्ट जीपीएस, एसओएस फंक्शन आहे. त्यामुळे आणीबाणी आल्यास आपण लोकेशन पाठवू शकतो. २४४० एएमएच बॅटरी, युएसबी सी पोर्ट, ब्ल्यू टूथ, सुविधा आहे. वॉकीटॉकीला २ इंची कलर स्क्रीन दिला असून आउट डोअर मध्ये फाँट, कंटेंट स्वच्छ दिसतात. हा वॉटर आणि डस्ट प्रूफ असून त्याची किंमत ३९९ युआन म्हणजे ४०५० रुपये आहे.

Leave a Comment