रहस्यमयी रेडीओ स्टेशन- द बझर


सोर्स बीबीसी
जगभरात अनेक ठिकाणी रेडीओ स्टेशन्स पाहायला मिळतात मात्र रशियाच्या सेंट पिटसबर्ग पासून काही अंतरावर पण ओसाड जागी असलेले एक रेडीओ स्टेशन सर्व जगाच्या दृष्टीनेच रहस्यमयी बनले आहे. हे रेडीओ स्टेशन नक्की कोण चालविते याची माहिती कोणालाच नाही मात्र काही ठराविक अंतराने म्हणजे आठवड्यांतून कधी एकदा कधी दोनवेळा येथून गुढ, अगम्य भाषेत काही प्रसारण ऐकू येते आणि जगभरात कुठेही ते ऐकता येते. १९८२ पासून काही नियमित अंतराने पण ज्याचे डी कोडिंग अजून कुणीही करू शकलेले नाही अश्या भाषेत येथून काही कुजबुज अथवा काही शब्द ऐकू येतात. विशेष म्हणजे कोणत्याच रेकॉर्ड मध्ये या स्टेशनची नोंद नाही.


काही जणांच्या मते शीतयुद्ध काळात हे रशियन लष्कराचे गुप्त रेडीओ स्टेशन होते. पण रशियन सरकारने त्याचा नेहमीच इन्कार केला आहे. या स्टेशनला MDZHB असे संबोधले जाते मात्र पाश्च्यात्य जगात त्याचे नामकरण द बझर असे केले गेले आहे. गेली ३५ वर्षे येथून मध्येच कधीतरी महिला अथवा पुरुषाच्या आवाजातील संभाषण प्रसारित होते मात्र अन्य कोणतेही कार्यक्रम, बातम्या येथून कधीच प्रसारित झालेल्या नाहीत. काही जणांच्या मते येथून एलियन्स म्हणजे परग्रहवासियांशी संपर्क साधला जातो.

काही जणांच्या मते रशियन सेनेचे पाणबुड्याशी संपर्क साधण्याचे हे माध्यम आहे. तर काही लोकांच्या मते रशियावर अणु हल्ला झाला की हे स्टेशन बंद होईल करण रशिया शत्रूवर जबाबी हल्ला चढवेल. सर्वात मजेदार बाब म्हणजे सोविएत रशियाचे विघटन झाल्यावर या स्टेशनवरील प्रसारणे होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.

Leave a Comment