या सरोवरापासून जातो स्वर्गाचा मार्ग


सोर्स -उत्तरांचल डॉट कॉम
उत्तराखंड राज्यात अश्या अनेक जागा आहेत ज्यांचा धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख सापडतो. सतोपंथ सरोवर हे निसर्गसुंदर नैसर्गिक सरोवर महाभारत काळाशी जोडलेल्या घटनांशी संबंधित आहेत. चौखंबा शिखराच्या पायथ्याशी हे सरोवर असून सतोपंथ म्हणजे सत्याचा मार्ग असा अर्थ आहे. पांडव स्वर्गारोहण करताना याच मार्गाने गेले तेव्हा पांडवांपैकी भीम येथे कोसळला असे मानले जाते. यामुळेही या सरोवराला महत्व प्राप्त झाले आहे.


सोर्स- लेह लडाख एक्सपी
अनेक भाविक तसेच ट्रेकर्स या ठिकाणी आवर्जून भेट देतात. या सरोवरात स्नान आणि ध्यान याचे विशेष महत्व आहे. असेही सांगतात याच सरोवराकाठी युधिष्ठीराला स्वर्गात नेण्यासाठी स्वर्गीय वाहन आले होते. समुद्रसपाटीपासून १५१०० फुट उंचीवर असलेले हे सरोवर बद्रीनाथ पासून २५ किमी अंतरावर आहे. सरोवराचे पाणी अतिशय स्वच्छ आणि हिरव्या रंगाचे आहे. असे मानले जाते जेव्हा या सरोवराचे पाणी स्वच्छ आहे तोपर्यंत पुण्याच्या प्रभाव कायम राहणार आहे.

बहुतेक सर्व सरोवरे गोल अथवा लंबगोलाकार असतात. पण सतोपंथ सरोवर त्रिकोणी आहे. असेही मानले जाते की या तीन कोपऱ्यांवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी तप, उपासना केली होती. या सरोवरात स्नान करणे म्हणून पवित्र मानले गेले आहे. या सरोवरापासून पुढे स्वर्गरोहिणी शिखराचा मार्ग आहे. हा स्वर्गाचा मार्ग मानला जातो. स्वर्गात जाण्यासाठी येथे सात पायऱ्या असल्याचे सांगतात. पैकी तीन पायऱ्या दिसू शकतात पण बाकीचा भाग सतत बर्फ आणि दाट धुक्याने झाकलेला असतो.

Leave a Comment