यंदा प्रथमच दुपारी होणार आयपीएलचे लिलाव


बीसीसीआय तर्फे आयपीएल २०२०च्या लिलावात सामील केल्या गेलेल्या अंतिम ३३२ खेळाडूंची यादी जाहीर केली गेली असून हे लिलाव कोलकाता येथे १९ डिसेंबरला दुपारी ३.३० वा.सुरु होणार आहेत. यंदा प्रथमच आयपीएलचे लिलाव सकाळ ऐवजी दुपारी सुरु होत आहेत. या लीलावांसाठी ९९७ खेळाडूंनी नोंदणी केली होती मात्र त्यातील ३३२ जणांची निवड झाली आहे. यात भारताचे १८६, परदेशी १४३ तर आयसीसी सदस्य देशातील तीन खेळाडूंचा समावेश आहे.

यंदा प्रथमच अमेरिका आणि स्कॉटलंडचे खेळाडू सामील झाले असून अमेरिकेचा अली खान तर स्कॉटलंडचा जॉर्ज यांचा समावेश आहे. दोन कोटीच्या टॉप बेस प्राईज मध्ये भारताचा एकाही खेळाडू नाही मात्र या ७ खेळाडू मध्ये पाच ऑस्ट्रेलियाचे आहेत.

दीड कोटी बेस प्राईज मध्ये भारताचा रॉबीन उत्थापा एकमेव खेळाडू आहे तर १ कोटी बेस प्राईज मध्ये पियुष चावला, युसुफ पठाण, जयदेव उनादकट यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी उनादकटची बेस प्राईज दीड कोटी होती तेव्हा त्याला ८.४ कोटी मध्ये खरेदी केले गेले होते. दीड कोटी बेस प्राईज मध्ये निवडल्या गेलेल्या १० खेळाडूत इंग्लंडचे ४, ऑस्ट्रेलियाचे तीन तर द,आफ्रिकेचे २ खेळाडू आहेत.

सर्वाधिक वयाचा खेळाडू प्रवीण तांबे असून तो ४८ वर्षांचा गोलंदाज आहे. विदेशी खेळाडूत ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर फवाद अहमद या वयाने सर्वात मोठा आहे तर अफगाणिस्थानचा स्पिनर नूर महमद सर्वात लहान म्हणजे १५ वर्षाचा आहे.

Leave a Comment