पबजी निर्मात्यांचा नवा गेम प्रोलॉग


प्लेअर्स अननोन बॅटल ग्राउंड म्हणजे पबजीच्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते ब्रॅडन ग्रीन यांनी नवा गेम डेव्हलप केला असून त्याचा पहिला टीझर नुकताच सादर झाला आहे. प्रोलोग नावाने हा नवा गेम बाजारात येत असून पहिल्या ३० सेकंदाच्या टीझर मध्ये तो सर्व्हायव्हर गेम असल्याचे लक्षात येत आहे. यात लीड रोल मधील हिरो एका जंगलात कठीण परिस्थितीत जिवंत राहण्याचा प्रयत्न करतो असे संकेत मिळत आहेत. या गेमचे आणखी काही ट्रेलर व्हिडीओ लवकरच रिलीज केले जातील असे समजते.

आज घडीला जगभरात पबजी तुफान लोकप्रिय ठरला असून रोज कोट्यवधी लोक हा गेम खेळत आहेत. हा गेम सादर करणारी कंपनी टेनसेंट पबजीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून खुश असून या गेमसाठी हायएंड स्मार्टफोन आवश्यक आहे. मात्र ज्या युजर्सकडे हायएंड स्मार्टफोन नाहीत त्यांचीही हा गेम खेळण्याची उत्सुकता लक्षात घेऊन कंपनीने पबजी लाईट हा गेम सादर केला आहे. हा गेम स्वस्त आणि बजेट स्मार्टफोन वर खेळता येणार आहे. ही लाईट व्हर्जन २ जीबी किंवा त्यापेक्षा कमी रॅमच्या फोनवर खेळता येणार असल्याने आता मोठ्या संख्येने युजर्स या गेमचा आनंद घेऊ शकतील असे जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment