वीजेवर चालणाऱ्या जगातील पहिल्या एअरक्राफ्टने घेतले उड्डाण

(Source)

कॅनडाच्या वँकूवर येथे मंगळवारी पुर्णपणे वीजेवर चालणाऱ्या कमर्शियल एअरक्राफ्टचे परिक्षण करण्यात आले. यावेळ एअरक्राफ्टने 15 मिनिटे उड्डाण घेतले. सिएटलची मॅग्निक्स कंपनीनुसार, हे 62 वर्ष जुने सी प्लेन आहे. यामध्ये 750 एचपीची इलेक्ट्रिक मोटर आहे. ज्याद्वारे वीजेची निर्मिती होईल. या विमानात 6 प्रवासी प्रवास करू शकतात.

ऑस्ट्रेलियाची इंजिनिअरिंग कंपनी मॅग्निक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोई गेंजास्की म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे स्वस्त हवाई प्रवास करता येईल व यामुळे कार्बन उत्सर्जन देखील कमी होईल. याला आपण ई विमानाचे युग देखील म्हणू शकतो. कार्बन उत्सर्जनाचे एक मोठे कारण विमान सेवा आहे. ई विमानांद्वारे प्रदुषण कमी होईल, मात्र यासाठी वेळ लागेल. याच्या विकासाची गती खूप कमी आहे.

कंपनीचे सीईओ रोई गेंजास्की यांच्यानुसार, कंपनीने विमानाची मोटर तयार करण्यासाठी हार्बर एअरसोबत मिळून काम केले. हार्बर एअर वँकूवर-स्की रिजॉर्ट्स आणि आजुबाजूच्या भागातील द्वीपांवर दरवर्षी 5 लाख लोकांना सेवा पुरवते.

 

Leave a Comment