या सॉफ्टवेअरद्वारे पती-पत्नी ठेवतात एकमेंकावर पाळत

(Source)

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अशा खाजगी गोष्टी असतात, ज्या ती व्यक्ती दुसऱ्यांशी शेअर करत नसते. कारण प्रत्येकाला स्वतःची अशी एक प्राव्हेसी असते. मात्र सध्या बाजारात अनेक सॉफ्टवेअर असे आले आहेत की, ज्याच्या मदतीने मोबाईलद्वारे व्यक्तीची हेरगिरी केली जाते. जगभरात सध्या पती-पत्नी एकमेंकाची हेरगिरी करण्यासाठी अशा सॉफ्टवेअरचा वापर करत आहेत. या सॉफ्टवेअरला स्टॉकरवेअर असे म्हटले जाते.

या स्टॉकरवेअरद्वारे हव्या त्या डिव्हाईसचा डेली रिपोर्ट तुम्हाला मिळतो. हे सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला चॅट, मेसेज किंवा फोन कोणत्या गोष्टीसाठी वापरला या गोष्टी माहिती पडतात. या सॉफ्टवेअरचा वापर अनेक पती-पत्नी एकमेकांची हेरगिरी करण्यासाठी करतात.

स्टॉकरवेअर सहज इंटरनेटवर खरेदी करता येते. कॅस्पकी रिसर्चर सांगतात की, प्रोटेक्शन टेक्नोलॉजीने आतापर्यंत यावर्षी 37,352 डिव्हाईसमध्ये स्टॉकरवेअरचा शोध लावला आहे.

मुख्य सिक्युरिटी रिसर्चर डेव्हिड सांगतात की, ही एक गंभीर समस्या असून, हे प्रकरण खूप मोठे आहे. अनेक लोक आपल्या लॅपटॉप आणि डेस्कटॉप कॉम्प्यूटरला तर सुरक्षित ठेवतात. मात्र मोबाईल डिव्हाईसला सुरक्षित ठेवत नाही. कॅस्पर्सकी रिसर्चनुसार, स्टॉकरवेअरचा वापर सर्वाधिक प्रमाणात रशियामध्ये होतो. त्यानंतर भारत, ब्राझील, अमेरिका आणि जर्मनी या देशांमध्ये याचा वापर केला जातो.

Leave a Comment