सावधान ! या ठिकाणी मोबाईल चार्ज केल्यास बँक खाते होईल रिकामे

(Source)

जर तुम्हाला देखील कोणत्याही ठिकाणी मोबाईल चार्ज करण्याची सवय असले तर ती लगेच त्वरित सोडा. कारण एक छोटीशा चुकीमूळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. याबाबत स्वतः भारतीय स्टेट बँकेने (आरबीआय) आपल्या ग्राहकांना सुचना दिली आहे.

भारतात वारंवार ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने सावधानता बाळगण्यास सांगितले आहे. कारण फसवणूक केवळ एटीएमने नाही, तर तुमचा स्मार्टफोन हॅक करून देखील होऊ शकते. आपण अनेकदा विमानतळ, रेल्वे स्टेशन, हॉटेलमध्ये आपला फोन चार्ज करत असतो. मात्र पुढच्या वेळेस असे करताना एकदा विचार नक्की करा, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होईल.

याबाबतची माहिती स्वतः एसबीआयने ट्विट करत दिली आहे. एसबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही चार्जिंग स्टेशनवर (सार्वजनिक ठिकाणी) फोन चार्जिंग करण्याआधी दोनदा विचार करा. मालवेअरमुळे फोनचा डेटा चोरी होऊ शकतो. यामुळे हॅकर्सला तुमचा पासवर्ड आणि डेटा एक्सपोर्ट करण्याची संधी मिळते. त्यामुळे तुमचा फोन कोणत्याही चार्जिंग स्टेशनवर चार्ज करू नका.

बँकेने म्हटले आहे की, तुमचा फोन जूस हॅकिंगचा शिकार होऊ शकतो. तुमच्या चार्जिंग केबलद्वारे फोनमधील बँकेचे खाजगी माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते आणि तुमच्या आयुष्यभराची कमाई सेंकदात गायब होऊ शकते. याशिवाय डाटा कनेक्शन आणि यूएसबीच्या मदतीने हॅकर्स तुमच्या फोनमध्ये मालवेअर इंस्टॉल करू शकतात.

जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये बँकेचे खाते नंबर, पासवर्ड, एटीएम कार्ड अथवा अन्य माहितीचे फोटो ठेवत असाल तर तुमची माहिती सहज लीक होऊ शकते. सार्वजनिक डिव्हाईस, ओपन नेटवर्क आणि फ्री वाय-फायचा वापर करणे देखील धोकादायक आहे.

Leave a Comment