… म्हणून ओडिसाच्या विद्यार्थ्याचे रशियाच्या राष्ट्रपतींनी केले कौतूक

(Source)

पाण्याची नासाडी रोखण्यासाठी तयार केलेल्या मशीनसाठी ओडिसाच्या एका विद्यार्थ्याची रशियाची राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी कौतूक केले आहे. या विद्यार्थ्याचे नाव बिस्वनाथ पात्रा असे आहे. बिस्वनाथने डीप टेक्नोलॉजी एज्युकेशन प्रोग्राम आणि नीति आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनच्या (एआयएम) कार्यक्रमात वॉटर डिस्पेंसरचे प्रदर्शन केले होते. हा कार्यक्रम रशियातील सोची येथे रशियाची संस्था सीरियस (SIRIUS) 28 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या काळात आयोजित केला होता. कार्यक्रमात पुतिन हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.

ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील ट्विट करत बिस्वनाथला शुभेच्छा दिल्या.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये पुतिन प्रोजेक्टवर प्रभावित होऊन म्हणत आहे की, आमची इच्छा आहे की तुमच्यासारखी अन्य मुले देखील भारतातून येथे येऊन कार्यक्रमात सहभागी व्हावीत. मला वाटते हे शानदार आहे. शेवटी पुतिन विद्यार्थ्यांना विचारतात की येथे येऊन कसे वाटले ? यावर मुले देखील आनंदाने होकार देतात.

बिस्वनाथ 25 विद्यार्थ्यां पैकी एक आहे, ज्यांचा प्रोजेक्ट सोचीमध्ये प्रदर्शन करण्यासाठी निवडण्यात आला. केंद्रीय विद्यालयात शिकणारा बिस्वनाथ ओडिसामधील एकमेव विद्यार्थी आहे, ज्याला रशियाला जाण्याची संधी मिळाली. बिस्वनाथच्या शिक्षकांनुसार, तो मागील एक वर्षांपासून स्मार्ट वॉटर डिस्पेंसर बनविण्यासाठी मेहनत घेत आहे. यातून पाणी येते, मात्रा वाया जाणारे पाणी देखील फिल्टर करण्याची प्रक्रिया आहे.  एका स्मार्ट वॉटर डिस्पेंसरची किंमत 5 ते 7 हजार रुपये आहे.

Leave a Comment