व्हिंटेज कारच्या नोंदणीकरणासाठी सरकारने सुचवले नवीन नियम

(Source)

केंद्र सरकारने व्हिंटेज कारचे नियमन आणि नोंदणीकरणाच्या प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी नवीन नियमांचा प्रस्ताव दिला आहे. रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने व्हिंटेज मोटर वाहन नियमन आदेश 2019 मसुदा तयार केला आहे. मसुद्यातील नियमांचा उद्देश व्हिंटेज वाहनांना त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि सुंदरतेचे संरक्षण करणे हे आहे.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जुन्या व्हिंटेज वाहनांच्या नोंदणीकरणासाठी कोणतीही औपचारिक प्रक्रिया नव्हती. व्हिंटेज कारच्या रँलींचे संचालन करताना हा एक मुद्दा समोर आला. कारचे निरिक्षण अथवा फिटनेस तपासणीसाठी कोणतीही निर्धारित प्रक्रिया नव्हती. अनेकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले आणि केंद्रीय मोटर वाहन नियम – तांत्रिक स्थायी समितीच्या 55व्या बैठकीत चर्चा केली गेली.

केंद्रीय मोटर वाहन नियमांनुसार, केंद्र सरकार सध्या व्हिंटेज कार रॅलींमध्ये भाग घेणाऱ्या वाहनांना नोंदणीमध्ये सूट देते. नियमांनुसार, व्हिंटेज कारचा अर्थ होतो 50 वर्ष जुनी कार.

परिवहन मंत्रालयाने जनतेकडून या मसुद्यावर 30 दिवसांच्या आत आपले मत मागितले आहे. आदेशानुसार, सर्व व्हिंटेज वाहनांना नियमित कामासाठी रस्त्यावर चालवले जाऊ शकत नाही. तसेच, कोणत्याही व्यावसायिक कामासाठी देखील त्याचा वापर करता येणार नाही.

केंद्राने व्हिंटेज कारच्या नोंदणी प्रक्रियेच्या संचालनासाठी राज्य स्तरावर एक व्हिंटेज मोटर वाहन राज्य समिती बनवण्याचा देखील प्रस्ताव दिला आहे.

Leave a Comment