आता पिझ्झा पॉकेट सांगेल 4 तास चाला आणि चॉकलेट 22 मिनिटे पळा

(Source)

ब्रिटनमध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोबोरो युनिवर्सिटीच्या संशोधकांनी सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, खाणे-पिण्याच्या वस्तूंच्या पॉकिटावर कॅलरी चार्ट लावण्यात यावा. यामध्ये हे देखील सांगितले जाईल की, ते खाल्यानंतर जेवण पचण्यासाठी कितीवेळ व्यायाम करणे गरजेचे आहे.

14 वेगवेगळ्या खाद्य पदार्थांच्या अभ्यासानंतर देण्यात आलेल्या या प्रस्तावात म्हटले आहे की, फूड पॅकेटवर सांगितले पाहिजे की पिझ्झा खाल्ला आहे तर 4 तास चाला, चॉकलेट खाल्ले असेल तर 22 मिनिटे धावा. खाद्य पदार्थांच्या पॅकेटवर लेबल लावल्याने याचा फायदा असा होईल की, लोक योग्य खाण्याकडे वळतील व निरोगी राहतील. संशोधकांचे म्हणणे आहे की, या प्रकारच्या लेबलिंगद्वारे दररोजच्या कॅलरीचे सरासरी प्रमाण 200 कॅलरी कमी करता येईल. ब्रिटनमध्ये सध्या दोन तृतियांश लोक लठ्ठपणाच्या समस्येशी लढत आहेत.

युनिवर्सिटीचे प्रमुख संशोधक अमांडा डेली यांचे म्हणणे आहे की, फूड पॅकेट्सवर लेबल लावल्याने लोकांना ते किती कॅलरी खात आहेत, हे लक्षात येईल. सर्वसाधारणपणे घरी बनलेल्या गोष्टीत कमी कॅलरी असतात. मात्र जर तुम्ही बाहेरून चॉकलेट मफिन खरेदी केले तर त्यात 500 ग्रॅम कॅलरी असतात. हे पचण्यासाठी 50 मिनिट पळायला लागेल. विशेषज्ञ टॉम क्विन म्हणाले की, लेबलिंगद्वारे लोकांना समजेल की, चुकीचे खाद्यपदार्थ खाणे कसे टाळावे.

Leave a Comment