वाह ! पूलमध्ये आंघोळ करत पहा कसोटी सामना, खाणे-पिणे मोफत

(Source)

कसोटी क्रिकेटला अधिक आकर्षक बनविण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. पारंपारिक कसोटी क्रिकेट आता डे-नाईट झाले आहे. बॉल लालवरून गुलाबी झाला आहे. आता ऑस्ट्रेलिया प्रेक्षकांसाठी एक नवीन प्रयोग सुरू झाला आहे. गर्मीमध्ये कसोटी सामना बघताना प्रेक्षक थंड होऊन सामन्याचा आनंद घ्यावा यासाठी स्विमिंग पूल तयार करण्यात आला आहे.

(Source)

सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पर्थच्या ऑप्टस स्टेडिअममध्ये डे-नाईट कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर पूल तयार करण्यात आला आहे. या पूलला बाउंड्री बीच क्लब असे नाव देण्यात आले आहे. ही पहिलच अशी वेळ आहे, जेथे क्रिकेट सामन्यात पूलची देखील व्यवस्था आहे.

या नवीन प्रयोगावर प्रेक्षक देखील खूष आहेत. यावेळी शानदार पेय पदार्थ देखील प्रेक्षकांना दिले जातात.

(source)

पर्थ स्टेडिअमच्या बाउंड्रीच्या बाहेर 14 मीटर पूलमध्ये एकावेळी 100 प्रेक्षक पाण्यात बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. आयोजकांच्या मते प्रत्येकी दोन तासानंतर पुलाची सफाई केली जाते. दोन लाईफ गार्ड देखील सुरक्षेसाठी येथे असतात.

(Source)

या पूलात मस्ती करत सामना बघण्याचा आनंद घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला 250 ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास 12 हजार रुपये) मोजावे लागतील. या तिकिटात तुम्हाला दोन तास पुलमध्ये आनंद घेण्याबरोबरच लंचसाठी बारबिक्यू आणि ड्रिंक्स देखील मिळेल.

Leave a Comment