या ठिकाणी सापडले तब्बल 44 हजार वर्ष जुने पेटिंग

(Source)

इंडोनेशियाच्या सुलावेसी या द्वीपावर एका गुहेत हजारो वर्ष जुने भित्तिचित्र सापडले आहे. हे जगातील सर्वात जुने भित्तिचित्र असल्याचे सांगितले जात आहे. 4.5 मीटर रुंद या दुर्मिळ भित्तिचित्राला गुहेच्या भिंत्तीवर बनवण्यात आले आहे. या चित्रात एक शिंग असणारा प्राणी आहे व शिकारी त्याचा पाठलाग करत आहे.

या भित्तिचित्रा संबंधित एक संशोधन नेचर पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. संशोधकांनुसार, यूरोपच्या गुहेत देखील अनेक कोळशापासून बनवलेले भित्तिचित्र सापडले आहे. मात्र या चित्राएवढे ते जुने नाहीत.

यूरोपच्या गुफेत सापडलेली चित्र 14 ते 21 हजार वर्ष जुनी असल्याची सांगितली जातात. आतापर्यंत याच चित्रांना जगातील सर्वात जुनी कलाकृती असल्याचे सांगितले जात असे.

ऑस्ट्रेलियातील ग्रफिथ युनिवर्सिटीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमचे म्हणणे आहे की, त्यांनी एवढे आश्चर्यकारक भित्तिचित्र पहिल्यांदा बघितले आहे. या संशोधनाचे लेखक मॅक्समी ऑबर्ट यांच्यानुसार, गुफेत सापडलेले भित्तिचित्र कमीत कमी 43,900 वर्ष जुने आहे. इंडोनेशियाच्याच बोर्निया द्वीपावर असेच एक भित्तिचित्र सापडले होते, त्याला देखील 40 हजार वर्ष जुने असल्याचे सांगितले जात होते.

Leave a Comment