या क्रिकेटपटूवर जडला उर्वशी रौतेलाचा जीव ?


अभिनेत्री उर्वशी रौतेलाची बॉलीवूडमध्ये हॉट आणि बोल्ड अशी ओळख आहे. आपल्या चित्रपटांपेक्षा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत तिचे नाव जोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याला उर्वशी डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होता. पण आता आणखी एका क्रिकेटपटूशी तिचे नाव जोडण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या क्रिकेटपटूसोबत रात्री उशिरापर्यंत उर्वशी फिरत होती.

यासंदर्भातील वृत्त मनोरंजन संकेतस्थळ ‘स्पॉटबॉय-ई’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाचा यष्टिरक्षक ऋषभ पंतला उर्वशी डेट करत आहे. १० डिसेंबर रोजी ते दोघेही रात्री ११च्या सुमारास डेटवर गेल्याचे म्हटले जात आहे. जुहूमधील ईस्टेला हॉटेलमध्ये हे दोघे एकत्र डिनर करताना दिसले. विशेष म्हणजे टी-20 मॅच सुरु होण्याच्या एक दिवसआधी डिनर डेटवर गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे.

उर्वशी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. काही मीडिया रिपोर्टनुसार एका पार्टीमध्ये हार्दिक आणि उर्वशीची भेट झाली होती. ते दोघे त्यानंतर डेटवर जाताना दिसले. पण उर्वशीने हे सर्व अफवा असल्याचे म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. नंतर हार्दिक सुद्धा उर्वशी नाही नताशा स्तांकोविकशी रिलेशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

Leave a Comment