2019 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक सर्च केल्या या टॉप-10 गोष्टी

(Source)

ज्या गोष्टीचे उत्तर कोणालाच माहिती नसते, त्याचे उत्तर गुगलकडे असते असे म्हटले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील गुगलवर भारतीयांनी अनेक गोष्टी सर्च केल्या. गुगलने 2019 मध्ये भारतीयांकडून सर्च करण्यात आलेल्या टॉप-10 गोष्टींची यादी शेअर केली आहे. टॉप ट्रेडिंग सर्चच्या आधारावर ही यादीत तयार करण्यात आली आहे.

(Source)

क्रिकेट विश्वचषक –

वर्ष 2019 मध्ये झालेला क्रिकेट विश्वचषक या यादीत टॉपवर आहे. भारत सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून हरल्यानंतर हा शब्द सर्वाधिक सर्च करण्यात आला.

(Source)

लोकसभा निवडणूक –

याच वर्षी भारतात लोकसभा निवडणूक पार पडली. त्यामुळे भारतीयांकडून याविषयीच्या गोष्टी गुगलवर सर्च करण्यात आल्या.

(Source)

चांद्रयान – 2 –

इस्त्रोचे महत्त्वकांक्षी अभियान चांद्रयान-2 चे वेड लोकांवर अजूनही आहे. हे मिशन भले ही 95 टक्के यशस्वी राहिले असेल, मात्र गुगलवर हे टॉप-3 मध्ये सर्च झाले.

(Source)

कबीर सिंह –

अभिनेता शाहिद कपूरचा चित्रपट कबीर सिंहबद्दल अनेक विवाद झाले. याच कारणामुळे या चित्रपटाला भारतीयांनी गुगलवर सर्च केले.

(Source)

एव्हेंजर्स – एंडगेम –

हॉलीवूड चित्रपट Avengers: Endgame या यादीत 5व्या स्थानावर आहे. यावरूनच हेच दिसते की, हॉलीवूड चित्रपटांची आवड भारतीयांमध्ये वाढत आहे.

(Source)

कलम 370 –

याच वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मिरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हा शब्द सर्वाधिक सर्चमध्ये 6व्या क्रमांकावर आहे.

(Source)

NEET Results –

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रांस टेस्टने (NEET) या यादीत सातवे स्थान मिळवले.

(Source)

जोकर –

हॉलीवूड चित्रपट जोकर देखील भारतात खूप सर्च करण्यात आला. अभिनेता Joaquin Phoenix चा हा चित्रपट सर्चमध्ये 8व्या स्थानावर आहे.

(Source)

कॅप्टन मार्वेल –

मार्वेल सिनेमॅटिक युनिवर्सचा हा चित्रपट सर्चमध्ये 9व्या क्रमांकावर आहे.

(Source)

प्रधानमंत्री किसान योजना –

पंतप्रधान किसान योजनेबद्दल लोकांच्या मनात जे प्रश्न होते ते देखील गुगलवर सर्च करण्यात आले.

Leave a Comment