‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ सम्मान मिळालेली ग्रेटा थनबर्ग ठरली सर्वात तरूण व्यक्ती

(Source)

स्वीडनची 16 वर्षीय पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गची अमेरिकेच्या टाइम मॅग्झिनने 2019 ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून निवड केली आहे. ग्रेटा हा पुरस्कार मिळवणारी सर्वात तरूण व्यक्ती ठरली आहे. तिच्या आधी 25 वर्षीय चार्ल्स लिंडबर्गची 1927 मध्ये ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून निवड करण्यात आली होती.

ग्रेटा या वर्षी सप्टेंबरमध्ये चर्चत आली होती. तिने संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाच्या समेंलनात जगातील शक्तीशाली नेत्यांवर ग्रीन हाउस गॅसचे उत्सर्जन रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. याआधी देखील ती स्वीडनच्या संसदेबाहेर पर्यावरणासाठी आंदोलन करत आहे.

मॅग्झिनने ग्रेटाला पर्सन ऑफ द इयर निवडल्या बद्दल लिहिले की, एका वर्षाच्या आतच स्वीडनच्या 16 वर्षीय मुलीने आपल्या देशाच्या संसदेबाहेर प्रदर्शन केले आणि त्यानंतर जगभरातील युवकांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. एवढ्या कमी वेळेतच तिला संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांची भेट घेण्याची संधी मिळाली. तिला ऐकण्यासाठी अनेक देशांच्या राष्ट्रपतींबरोबरच पोप देखील सहभाही होते. ती पृथ्वीवरील सर्वात मोठ्या मुद्याची सर्वात मोठा आवाज म्हणून पुढे आली आहे. तिचे म्हणणे आहे की, चुकीच्या दिशेने पावले उचलली जात असून, यात सुधारणा गरजेच्या आहेत.

Leave a Comment