2 ट्रिलियन डॉलरचे बाजार मूल्य असणारी ही ठरली जगातील पहिली कंपनी

(Source)

सौदी अरामको 2 ट्रिलियन डॉलर (142 लाख कोटी रुपये) बाजार भांडवल असणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अरामकोचे शेअर गुरूवारी 10 टक्क्यांनी वधारून 38.70 रियालवर (10.32 डॉलर) उघडले. यामुळे बाजार भांडवल थेट 120 अब्ज डॉलरवरून 2 ट्रिलियन डॉलर झाले. हे बाजार भांडवल अॅपल (1190 बिलियन डॉलर) आणि अमेझॉनच्या (867 बिलियन डॉलर) एवढे आहे. अरामकोचे मूल्य हे सौदी अरेबियाच्या जीडीपीच्या (779.29 अब्ज डॉलर) अडीच पट आहे.

सौदी अरामको ही एक सरकारी कंपनी आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आयपीओच्या आधीच कंपनीचे बाजार भांडवल 2 ट्रिलियन करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र बँका आणि आर्थिक सल्लागारांनी 1.5 ट्रिलियन ते 1.7 ट्रिलियन डॉलर एवढे मोजले होते. कंपनीने 1.7 ट्रिलियन बाजार मूल्य असताना आयपीओद्वारे 1.5 शेअर विकून 2,560 कोटी डॉलर (1.82 लाख कोटी रुपये) जमा केले होते.

अरामकोचे शेअर बुधवारीच लिस्ट झाले होते. पहिल्याच दिवशी 10 टक्के वधारले होते. सौदी सरकार आयपीओला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक गुंतवणूकदारांना स्वस्त लोन आणि बोनस शेअर देण्याची योजना आणत आहे. गुंतवणूकदारांनी विक्री करू नये यासाठी कंपनीने पुढील वर्षी 75 अब्ज डॉलर डिव्हिडेंड देण्याची घोषणा केली होती. जे गुंतवणूकदार लिस्टिंगच्या दिवसापासून सहा महिन्यांपर्यंत शेअर होल्ड करतील त्यांना 10 वर 1 बोनस शेअर देण्यात येईल. याची सीमा 100 शेअर असेल. आयपीओमध्ये ज्या गुंतवणूकदारांना शेअर मिळाले नाहीत, ते आता खरेदी करू शकतात.

 

Leave a Comment