बाबो ! या कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला तब्बल 35 लाखांचा बोनस

(Source)

2019 हे वर्ष संपण्याच्या वाटेवर आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोक सुट्ट्यांवर जात आहेत. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अमेरिकेतील एका रिअल स्टेट कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला 35-35 लाख रुपये बोनस दिला आहे. कंपनीने आपल्या सर्व 198 कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी 71 कोटी रुपये खर्च केले.

अमेरिकेच्या बाल्टीमोर येथील कंपनी सेंट जॉन प्रॉपर्टीज नावाच्या कंपनीने हा कारनामा केला आहे. कंपनीची हॉलिडे पार्टी सुरू होती, याचवेळी बोनसची घोषणा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळानुसार बोनस देण्यात आला. अधिकतर कर्मचाऱ्यांना 35 लाख रुपये बोनस मिळाला.

कंपनी यावर म्हणाली की, यावर्षी चांगली कामगिरी केल्याने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पैसे देणे शक्य झाले. अमेरिकेच्या 8 राज्यात कंपनीचे ऑफिस, रिटेल स्टोर आणि गोदामासाठी 2 कोटी स्केअर फूट घर तयार केले आहे. बोनसचा चेक स्विकारल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.

हा हॉलिडे बोनस कंपनीकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक बोनसपेक्षा वेगळा आहे. बोनसची घोषणा करताना कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन एडवर्ड सेंट जॉन म्हणाले की, मी हा आनंद साजरा करू इच्छितो. ज्या लोकांनी कंपनीसाठी मनापासून काम केले, मी त्यांचे आभार मानतो.

Leave a Comment