कॉमिक्स सुपरहिरोच्या अवतारात दिसणार रणवीर सिंह


बॉलीवूडचा डॅडी अर्थात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर एक सुपरहिरो चित्रपट मालिका बनवण्याची तयारी करत आहे. त्याने या चित्रपटांसाठी सुपरहिरो म्हणून अभिनेता रणवीर सिंग याची निवड केली आहे.

येत्या काळात रणवीर प्रेक्षकांना सुपरहिरो ‘नागराज’च्या अवतारात दिसणार आहे. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज कॉमिक्सचे सहसंस्थापक संजय गुप्ता यांनी करण जोहरच्या या आगामी प्रकल्पाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून करण जोहर, रणवीर सिंह आणि नागराज यांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याची पोस्ट संजय गुप्ता यांनी केली आहे. राज कॉमिक्स आणि धर्मा प्रोडक्शन एकत्र येऊन एका सुपरहिरो चित्रपट मालिकेची निर्मिती करणार आहेत, अशी शक्यता या पोस्टमुळे वर्तवण्यात येत आहे.

नागराज हा एक कॉमिक्स सुपरहिरो असून १९८६ साली राज कॉमिक्ससाठी राजकुमार गुप्ता, मनोज गुप्ता व संजय गुप्ता या तिघांनी मिळून ‘नागराज’ या सुपरहिरो व्यक्तिरेखेची निर्मिती केली होती. लहान मुलांच्या सर्वाधिक आवडत्या भारतीय सुपरहिरोंपैकी एक म्हणून नागराज ओळखला जातो.

Leave a Comment