नवीन व्हिसा नियमांमुळे इंग्लंडमध्ये शिकणे झाले सोपे

(Source)

इंग्लंडच्या सरकारने तेथे राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा स्कीमची घोषणा केली आहे. या स्कीम अंतर्गत त्यांना 2 वर्षांचा पोस्ट स्टडी व्हिसा देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये यशस्वी करिअर बनविण्यासाठी मदत मिळेल. नवीन व्हिसा नियमांमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्या योग्यतेनुसार जॉब शोधण्यासाठी 2 वर्षांची संधी मिळेल.

यॉर्क आणि नॉर्थ यॉर्कशायर –

नॉर्थ यॉर्कशायर इंग्लंडची सर्वात मोठी काउंटी आहे आणि देशातील सर्वात सुंदर भागांपैकी एक आहे. यॉर्क एक छोटे शहर असून, येथील लोकसंख्या 2 लाख आहे. येथे दरवर्षी 60 लाख पर्यटक येतात. येथे विद्यार्थ्यांसाठी देखील अधिक चांगल्या सेवा मिळतात.

यॉर्क सेंट जॉन यूनिवर्सिटी आणि भारत –

या यूनिवर्सिटीचे आणि भारताचे एक खास नाते आहे. मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे लोक येथून शिकून बाहेर पडले आहेत. भारतीय युनिवर्सिटीबरोबर याची भागिदारी देखील आहे. येथे 100 पेक्षा अधिक देशातील विद्यार्थी शिकतात. या युनिवर्सिटीला विद्यार्थ्यांमध्ये समाधानाच्या बाबती टॉप 30 आणि गुणवत्तेनुसार टॉप-10 युनिवर्सिटीमध्ये जागा मिळाली आहे.

यॉर्क कँपसमध्ये जवळपास 7000 विद्यार्थी शिकतात व लंडनमध्ये देखील नवीन कँपस सुरू करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला अनेक कोर्सचा पर्याय, प्रत्येक प्रकारची लोक मिळतील. याशिवाय विद्यार्थ्यांना वैयक्तिगत गरजेनुसार सुविधा मिळेल. कोर्सचा कमी कालावधी, विद्यार्थ्यांसाठी वेगळे ट्यूटर, ओपन डोर सपोर्ट पॉलिसी सारख्या सुविधा मिळतील. आपल्या गरजे व सुविधेनुसार येथे अभ्यास करता येतो.

करिअरमध्ये मदत-

याशिवाय येथे लाँचपॅड करिअर सेंटरच्या माध्यमातून इंटरव्यू कौशल्य, रिझ्यूम तयार करणे आणि करिअरची योजना बनवण्यास मदत केली जाते. ग्रेड2 डायरेक्टर प्रोग्राम आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असतो व यात विद्यार्थ्यांना इंग्लंड अथवा स्वतःच्या देशात स्वतःचा उद्योग सुरू करण्यास मदत केली जाते.

वर्ष 2020 मध्ये तुम्ही येथे अडमिशन घेण्यासाठी अर्ज करू शकता. येथे स्कॉलरशिपसाठी देखील अनेक पर्याय आहेत.

Leave a Comment