बँक खाते बंद करायचे आहे ?, जाणून घ्या या 6 गोष्टी

(Source)

बँकेत खाते उघडण्याऐवजी त्यापेक्षा ते बंद करणे अधिक अवघड आहे. आपला ग्राहक दुसऱ्या बँकेत जावा असे कोणत्याच बँकेला वाटत नाही. अशावेळी ग्राहकांसाठी खाते बंद करणे अवघड होते. खाते बंद करण्यासाठी काय काय केले पाहिजे ते जाणून घेऊया.

(Source)

डिलिंकिंग –

बँक अकाउंट बंद करण्याआधी त्याला डिलिंक करावे लागेल. जर तुम्ही खात्याचा वापर गुंतवणूक, लोनचा हफ्ता, ट्रेडिंग करणे आणि क्रेडिट कार्ड पेमेंट करणे यासाठी करत असाल तर तुम्हाला खाते डिलिंक करावे लागेल. त्यानंतर या गुंतवणूक व पेमेंट्ससाठी दुसरा खाते क्रमांक नोंदवावा लागेल. खाते बंद करताना तुम्हाला डिलिंकिंग फॉर्म भरावा लागेल.

(Source)

क्लोजर फॉर्म भरावा लागेल –

बँकेतून तुम्हाला क्लोजर फॉर्म मिळेल, ज्यात तुम्हाला खाते का बंद करायचे आहे हे विचारले असेल. याशिवाय आणखी एक फॉर्म मिळेल त्यात खात्याची माहिती द्यावी लागेल, ज्यात बँलेंस फंड ट्रांसफर केला जाईल. खाते बंद करण्यासाठी स्वतः ग्राहकाला बँकेत जावे लागेल.

(Source)

कागदपत्र –

बँक तुमचे न वापरलेले चेकबुक्स मागते. जे फॉर्मसोबत जमा करावे लागेल. ही कागदपत्र तुमचे एटीएम कार्ड बंद करेल.

(Source)

खाते बंद करण्याचा अर्ज –

जर तुम्ही खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आतच बंद करत असाल तर तुमच्याकडून क्लोजर चार्ज वसूल केला जाणार नाही. जर तुम्ही खाते उघडल्यानंतर 1 वर्षांच्या आत बंद करत असाल तर तुमच्याकडून क्लोजर चार्जेस घेतले जातील. सर्वसाधारण 1 वर्षानंतर हे चार्जेस घेतले जात नाहीत.

(Source)

खात्यातील रक्कम –

बँक खात्यातील 20 हजारांपर्यंतची रक्कम रोख दिली जावू शकते. तुम्ही रक्कमेसाठी अन्य पर्याय देखील निवडू शकता.

(Source)

खाते बंद करण्याआधी एक मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रांसफर करा. त्या शेवटच्या अकाउंट स्टेटमेंटला सांभाळून ठेवा.

Leave a Comment