घर खरेदीवर करू शकता 7 लाखांची टॅक्स बचत

(Source)

होम लोनवर अनेक प्रकारची सूट मिळत असते. काही लोक केवळ गुंतवणूक म्हणून देखील घर खरेदी करत असतात. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जुलैमध्ये अफोर्डेबल हाउसिंगसाठी करामध्ये 1.5 लाखांच्या वेगळी सूट देणार असल्याची घोषणा केली होती. 2 लाखांपर्यंतची सूट आधीपासूनच आहे. या प्रकारे ही सूट 3.5 लाखांपर्यंत झाली. मात्र तुम्ही 7 लाखांपर्यंतची सूट सहज मिळवू शकता. त्याविषयी जाणून घेऊया.

1.5 लाखांची स्पेशल सूट केवळ 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या काळात लोन घेतलेल्यांनाच मिळेल. होम लोनवर 80सी, 80ईई आणि 24बी अंतर्गत करात सूट मिळते.

80सी अंतर्गत लोनची प्रिसिंपल अमाउंट दिल्यावर 1.5 लाखांपर्यंतची सूट मिळते. यामध्ये पीएफ इन्वेस्टमेंट, फिक्सड डिपॉजिट, म्यूच्युअल फंड्स, नॅशनल सेव्हिंग स्कीमच्या गुंतवणुकीचा देखील समावेश आहे. कंस्ट्रक्शनचे काम पुर्ण झाल्यानंतर या सेक्शन अंतर्गत होम लोनच्या प्रिसिंपल अमाउंटवर टॅक्स बेनिफिटचा फायदा होईल.

सेक्शन 24बी –

या बजेटमध्ये मंत्रालयाने दुसऱ्या घराला सेल्फ ऑक्यूपाइट प्रॉपर्टी म्हटले आहे. या बजेटच्या आधी दुसऱ्या घराद्वारे मिळणाऱ्या भाड्यावर टॅक्स लागत असे. घर खाली असले तरी त्याद्वारे काही कमाई होत असल्याचे समजले जात असे. सेक्शन 24 बी अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत करात सूट मिळते. होम लोनचे व्याज भरताना याचा फायदा घेता येतो.

सेक्शन 80ईई-

या सेक्शनचा फायदा केवळ पहिल्यांदा घर घेणाऱ्यालाच होता. मात्र यासाठी अट अशी आहे की, मालमत्तेची किंमत 50 लाखांपेक्षा कमी आणि होम लोन हे 35 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. या सेक्शन अंतर्गत होम लोनच्या व्याजावर 1.5 लाखांपर्यंतची सूट मिळते. मात्र हे लोन सँक्शन 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 च्या आत झालेले असणे गरजेचे आहे.

जर पती आणि पत्नी दोघेही कमवत असतील तर जॉइंट प्रॉपर्टी खरेदी केल्यावर जॉइंट होम लोनमध्ये दोघांना मिळून जवळपास 7 लाखांपर्यंत करात सूट मिळते. जॉइंट होम लोनमध्ये दोघेही जण सेक्शन 24 अंतर्गत 2-2 लाख आणि सेक्शन 80सी अंतर्गत 1.5-1.5 लाखांचा फायदा घेऊ शकतात.

 

Leave a Comment