राणू मंडलबाबत प्रश्न विचारताच भडकला हिमेश रेशमिया


सोशल मीडियामुळे एका रात्रीत रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन पैसे कमावून उदरनिर्वाह करणारी राणू मंडल स्टार झाली. त्याचबरोबर गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने तिचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून तिला चित्रपटात गाण्याची संधीही दिली. बॉलिवूडमध्ये राणूला ब्रेक देणाऱ्या हिमेश आणि राणूमध्ये आता सारे काही आलबेल असल्याचे चित्र दिसत नाही.

हिमेश रेशमिया मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित होता. काही पत्रकारांनी त्याला या कार्यक्रमात राणूबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. या प्रश्नांची उत्तरे हिमेशने तर दिलीच नाही, पण उलट तो या प्रश्नांमुळे चांगलाच भडकला. मी राणू मंडलचा मॅनेजर नसल्याचे रागात उत्तर देत तो तिथून निघून गेला. हिमेशचे हे उत्तर ऐकून उपस्थितांपैकी अनेकांच्या भुवया उंचावल्यामुळे हिमेश आणि राणूमध्ये नेमके काय बिनसले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

Leave a Comment