अंतराळातील निष्क्रिय सेटेलाईट पृथ्वीवर आणण्यासाठी 2025 ला सुरू होणार मिशन

(Source)

युरोपियन स्पेस एंजेसी (ईएसए) अंतराळात खराब झालेल्या सेटेलाईटचे अवशेष उचलण्यासाठी 2025 पासून अभियान सुरू करणार आहे. हे जगातील पहिले स्पेस जंक कलेक्टर असेल. याला क्लिअर स्पेस-1 असे नाव देण्यात आलेले आहे. हा प्रोजेक्ट स्विझर्लंडच्या स्टार्टअपद्वारे पुर्ण करण्यात येईल. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, अंतराळात जमा झालेले अवशेष भविष्यातील मिशनसाठी अडचण ठरू शकते.

यामुळे अंतराळ साफ करण्याची गरज आहे. या मिशनवर जवळपास 943 कोटी रुपये खर्च येईल. ब्रिटनने या प्रोजेक्टसाठी जवळपास 100 कोटींची मदत केली आहे. सध्या अंतराळात जवळपास 2 हजार सेटेलाईट कार्यरत आहेत. तर तीन हजार सेटेलाईट फेल झाल्या आहेत. अंतराळात पृथ्वीच्या आजुबाजूला 60 वर्षात हजारो टन कचरा जमा झाला असून, यामध्ये जुन्या रॉकेटच्या अवशेषांसोबतच 3500 सेटेलाईट, 7.5 लाख छोटे मोठे तुकडे आहेत. हे तुकडे ताशी 20 हजार किमी वेगाने अंतराळात फिरत आहेत.

ईएसएचे संचालक जेन वॉर्नर म्हणाले की, अंतराळ स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन नियमांची गरज आहे. जे देश सेटेलाईट लाँच करतील त्यांनी जबाबदारी घ्यावी की जे सेटेलाईट उपयोगी नाहीत, ते संबंधित कक्षातून काढण्यात यावेत.

अंतळातील अवशेष काढण्यासाठी ईएसएने 2013 मध्ये वेस्पा नावाचा एक अवशेष पृथ्वीपासून 800 किमी लांब वेगा लाँचरच्या मदतीने सोडले होते. वेस्पाचे वजन 100 किलोग्रॅम आहे. जे एका सेटेलाईटच्या वजनाएवढे आहे. 2025 मध्ये क्लियर स्पेस – प्रोब जेव्हा अंतराळात पाठवले जाईल, त्यावेळी ते वेस्पाला आपल्या चार रोबोटिक हातांद्वारे पकडून कक्षेच्या बाहेर आणेल. त्यानंतर ते वातावरणात जळून नष्ट होतील व पृथ्वीवर पडतील.

Leave a Comment