Video : कारने आईला धडक दिल्यावर लहान मुलाने काय केले बघाच

(Source)

चीनमध्ये सध्या एका लहान मुलाचे जोरदार कौतूक केले जात आहे. लोक या मुलाच्या बहादुरीचे कौतूक करत आहेत. साउथवेस्टर्न चीमच्या चोंगकिंग येथे एक आई आपल्या मुलाबरोबर रस्ता पार करत होती. याचवेळी एक गाडी त्यांना टक्कर मारते. आई व मुलगा दोघेही खाली पडतात.

या अपघातानंतर मुलगा रडत रडत उठवतो व आईला उठण्यास मदत करतो. त्यानंतर रागात गाडीजवळ जातो व गाडीला लाथ घालतो. यानंतर गर्दी जमा होते. त्यानंतर धडक मारणारा व्यक्ती आई व मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो.

हा व्हिडीओ एमसीएमपी न्यूजने 11 डिसेंबरला शेअर केला होता. त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हा मुलगा आपल्या आईचा मोठा हिरो आहे. व्हिडीओ आतापर्यंत 60 हजारांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे.

https://twitter.com/csl_c/status/1204610742625767424

नेटकरी या लहान मुलाचे कौतूक करत आहेत.

या दुर्घटनेत आई व मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. पोलिसांच्या मते, या घटनेस पुर्णपणे चालक जबाबदार आहे.

Leave a Comment