यावर्षी पाकमध्ये गुगल टॉप-10 मध्ये सर्वाधिक सर्च झाल्या या 3 भारतीय व्यक्ती

(Source)

या वर्षी पाकिस्तानमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करणाऱ्या टॉप-10 व्यक्तींमध्ये भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचे नाव देखील आहे.

गुगल ट्रेंडस सर्च इन इयर 2019 च्या सुचीत भारताचा रियालिटी शो बिग बॉस सीझन 13 दुसरा सर्वाधिक ट्रेंडिग सर्च होता. तर टिव्ही शो मोटू पतलू या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. गायक अदनान सामी या यादीत 5व्या स्थानावर आहे.

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान गुगलच्या या यादीत सहाव्या स्थानावर आहे. सारा ‘केदारनाथ’ आणि त्यानंतर ‘सिंबा’ या चित्रपटामुळे चर्चेत आली होती.

तर विंग कमांडर अभिनंदन या यादीत नवव्या स्थानावर आहेत. अभिनंदन यावर्षी फेब्रुवारीमध्ये चर्चेत आले होते. त्यांनी पाकिस्तान एफ-16 विमान पाडले होते आणि याचवेळी त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने ते पाकिस्तानच्या सीमेत पोहचले होते.

Leave a Comment