आयसीसीच्या टी-20 रॅकिंगमध्ये 3 भारतीय फलंदाजांचा समावेश


नवी दिल्ली – वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला. विराट कोहलीने मुंबईतील अखेरच्या टी-२० सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली. पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. आयसीसीच्या क्रमवारीत विराटला या कामगिरीचा चांगलाच फायदा झाला आहे. आपल्या १५ व्या स्थानावरुन विराट थेट दहाव्या स्थानावर आला आहे.


याव्यतिरीक्त लोकेश राहुलच्या स्थानातही सुधारणा झाली आहे. राहुल नवव्या स्थानावरुन आता सहाव्या स्थानावर पोहचला आहे. पण एका स्थानाने रोहित शर्माची घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर पोहचला आहे. विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेनंतर आयसीसीने आपली अधिकृत क्रमवारी जाहीर केली आहे.

Leave a Comment