डिसेंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्ती असतात जादा फिट


वर्षाचा अखेरचा महिना डिसेंबर. या महिन्याचे एक विशेष सांगितले जाते ते म्हणजे या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती अधिक फिट आणि हेल्दी असतात आणि त्या फिटनेस बाबत कधीच तडजोड करत नाहीत. यासाठी अनेक व्यक्ती पुरावे म्हणून देता येतील. बॉलीवूड हिरो सलमान खान, जॉन अब्राहम, विद्युत जामवाल, राणा दुग्गुबाती, पुलकित सम्राट इतकेच नव्हे तर आपले धरम पाजी म्हणजे धर्मेंद्र, अनिल कपूर हेही डिसेंबर मध्ये जन्मलेले आहेत. या शिवाय क्रीडा क्षेत्राबद्दल बोलायचे तर आपला धडाकेबाज ओपनर शिखर धवन, युवराज सिंग यांचे देता येईल.


कोलंबिया विद्यापीठाच्या डिपार्टमेन्ट ऑफ मेडिसिन मध्ये झालेल्या संशोधनात असे आढळले की जानेवारी, जून, ऑगस्ट मध्ये जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत डिसेंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्ती कमी आजारी पडतात. त्यांना संसर्गजन्य रोगांची लागण कमी होते. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्ती सर्वाधिक आजारी पडतात तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जुलै मध्ये जन्मलेल्या व्यक्ती वय वाढत जाईल तसा त्यांना आजाराचा धोका कमी असतो.

डिसेंबर मधील व्यक्ती अधिक फिट असण्यामागे असे कारण देतात की या महिन्यात माणसाचे चयापचय चांगले असते त्यामुळे गर्भातील बाळाला तो फायदा मिळतो. चयापचय चांगले असेल तर आजार कमी होतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या अहवालानुसार डिसेंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्तीमध्ये अॅथलीट बनण्याची चांगली क्षमता असते.

Leave a Comment