चहा विषयी काही रोचक माहिती


जगभरात १५ डिसेंबर हा दिवस इंटरनॅशनल टी डे म्हणून साजरा केला जातो. जगभरात चहाचे शौकीन कोट्यावधींच्या संख्येने आहेत आणि अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरवात एक कप चहानेच करत असतात. या चहा विषयी काही रोचक माहिती या निमित्ताने करून घेणे योग्य ठरेल.

चहाचा शोध सर्वप्रथम चीन मध्ये लागला हे सत्य अनेकांना माहिती असेल. शीन नुंग नावाच्या राजाच्या गरम पाण्याच्या कपात नजरचुकीने चहाचे वाळलेले पान पडले आणि त्या पाण्याचा रंग बदलला. राजाने या पाण्याची चव घेतली तेव्हा त्याला तो स्वाद खुपच आवडला आणि त्यातून चहाचा शोध लागला. आज पाण्यानंतर जगात सर्वाधिक कुठले पेय प्यायले जात असेल तर ते आहे चहा. सुरवातीला हे पेय फक्त हिवाळ्यात औषध म्हणून प्यायले जात असे पण दररोज चहा पिण्याची प्रथा सर्वप्रथम भारतात १८३५ पासून सुरु झाली असे सांगतात.


आज जगात १५०० प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. मात्र काळा, पांढरा, पिवळा आणि हिरवा हे चहाचे प्रकार प्राचीन मानले जातात. चहा हे इराण आणि अफगाणिस्थानचे राष्ट्रीय पेय आहे. इंग्लंडवासीय रोज १६ कोटी कप चहा पितात म्हणजे वर्षाला चक्क ६० अब्ज कप. जगात एकूण जो चहा वापरला जातो त्यात काळ्या चहाचे प्रमाण ७५ टक्के आहे. भारतात आसाम हे चहा उत्पादन करणारे महत्वाचे राज्य असून चहाचे सर्वाधिक उत्पादन चीन आणि त्यापाठोपाठ भारतात होते.


अमेरिकेत विकल्या जाणारया चहामध्ये ८५ टक्के आईस टीची विक्री होते. तुर्की लोक रोज १० कप चहा पितात. चहा अँटीऑक्सिडंड असून त्यामुळे दिर्घयुष्य लाभते असे मानतात. रिकाम्या पोटी काळा चहा घेतल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो. फार उकळून चहा प्यायल्यास अल्सरचा धोका असतो. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या संशोधनात चहा प्यायल्याने हाडे मजबूत होतात असे दिसून आले आहे.

टी बॅग्जचा शोध चुकून लागला. अमेरिकन व्यापारी थॉमस सुलीवन याने चहाचे सँम्पल रेशमी कपड्यात बांधून ग्राहकाला दिले आणि त्याने त्या कपड्यासह ती बॅग पाण्यात घातली. तेव्हा सुलीवननी त्यापासून प्रेरणा घेऊन टी बॅग्ज विकायला सुरवात केली. चहामधील एल थेनाइन हे द्रव्य मेंदूची शक्ती वाढविते. स्ट्रेस कमी करते आणि बुद्धी विकास करते. यामुळे झोप पळून जाते असेही मानले जाते.

Leave a Comment