आशियातील सर्वात सेक्सी महिला ठरली आलिया भट्ट


यंदाच्या वर्षातील आशियातील सर्वाधिक सेक्सी महिला म्हणून बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टची निवड झाली आहे तर दशकातील सर्वाधिक सेक्सी महिलेचा मुकुट दीपिका पदुकोण हिला मिळाला आहे. लंडन मध्ये बुधवारी या ऑनलाईन निवडीचा निकाल जाहीर केला गेला. साप्ताहिक इस्टर्न आय तर्फे या वर्षाची ही यादी जाहीर केली गेली. विशेष म्हणजे आलिया साठी हे वर्ष खुपच चांगले गेले आहे. तिने यंदा अभिनयाच्या जोरावर अनेक पारितोषिके मिळविली आहेतच पण २०२०च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा आलीया, रणवीर जोडीचा गली बॉय चित्रपट पाठविला गेला आहे.

दशकातील सर्वाधिक सेक्सी आशियाई महिला म्हणून दीपिका पदुकोणची निवड झाली आहे. गेल्या वर्षी तिने वर्षातील सर्वाधिक सेक्सी महिला यादीत पहिला क्रमांक मिळविला होता यंदा ती या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आलिया तिच्या निवडीबाबत आनंद व्यक्त करून म्हणाली, खरे सौंदर्य दिसते त्यापेक्षा अधिक असते. आम्ही वृध्द होऊ तेव्हा आमच्या सौंदर्यात बदल होणार आहेच. पण मन आणि हृद्य चांगले असेल तर व्यक्ती नेहमीच सुंदर दिसते हे लक्षात घेतले पाहिजे. इस्टर्न आयचे संपादक अस्जाद नजीर म्हणाले, सध्या तरी सुंदरतेत आलियाचे राज्य आहे इतकेच नाही तर पुढील दशकात व्यावसायिक हिंदी चित्रपटात आलीयाचाच बोलबाला असेल. ती फिल्म स्टार पेक्षा नारी शक्तीचे प्रतिक वाटते. सशक्त आधुनिक महिलेचे प्रतिनिधित्व ती करते आहे.

Leave a Comment