पंकजा मुंडेंची Wait and Watch भूमिका


मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीमधील गोपीनाथगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी ‘स्वाभिमान दिवसा’चे आयोजन केले आहे. या दरम्यान त्यांना पक्षावर नाराज आहात का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी एवढे दिवस थांबलात. आणखी एक दिवस थांबा, असे उत्तर दिले आहे.

माझ्याकडे एकनाथ खडसे आले होते. जेवणाची वेळ होती. आम्ही एकत्र जेवण केले. कौटुंबिक स्वरुपाची ही भेट होती. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मुंडे साहेबांच्या गडावर जे ऐवढे दिवस येत होते, ते सर्व जण येणार आहेत. हा कार्यक्रम वेगळा आहे. कोणताही राजकीय रंग त्याला नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. भाजपमधील वरिष्ठ नेते येणार का? असा प्रश्न विचारला असता, ज्यांनी जाहीर केले आहे ते पक्षातील सर्व जण येतील, असे उत्तर पंकजांनी दिले.

आपण पक्षावरील नाराजीबाबत उद्या बोलणार आहात का, असे विचारले असता, आपण ऐवढे दिवस थांबलात, आणखी एक दिवस थांबा, असे हसत पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले. मी मुंडे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त परळीला निघाले आहे. मुंडे साहेबांचे भक्त आणि त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते तिथे येणार आहेत. गोपीनाथगडावर तयारी सुरु असून मी एक दिवस आधी रवाना होत आहे. जे काय बोलायचे आहे ते उद्या बोलेन, असे पंकजांनी स्पष्ट केले.

Leave a Comment