‘जयेशभाई जोरदार’मधून ही अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण


रणवीर सिंहच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आले होते. रणवीरसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. आता अभिनेत्रीच्या नावावरुन पडदा उठला आहे.

View this post on Instagram

A grateful heart🙏🏽

A post shared by Shalini (@shalzp) on


या संदर्भातील वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाद्वारे ‘अर्जुन रेड्डी’ या प्रसिद्ध तेलगू चित्रपटात दिसलेली अभिनेत्री शालिनी पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बॉलिवूडमध्ये रणवीरसोबत पदापर्ण करणे ही माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे. बॉलिवूडमधला सध्याचा आघाडीचा आणि बहुआयामी व्यक्तीमत्त्व असलेला रणवीर हा कलाकार असल्याची प्रतिक्रिया शालिनीने दिली.


या चित्रपटासाठी शालिनीने ऑडिशनही दिल्याचे समजत आहे. रंगभूमीवरून आपल्या करिअरची २५ वर्षीय शालिनीने सुरुवात केली. त्यानंतर तिने तेलगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

View this post on Instagram

🐞

A post shared by Shalini (@shalzp) on


‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात रणवीर एका गुजराथी मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी रणवीरने आपले वजनही कमी केले आहे. रणवीरने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेपेक्षा ही भूमिका नक्कीच खूप वेगळी आणि हटके ठरणार आहे.


‘जयेशभाई हा हिरो आहे. तो एक सर्वसामान्य माणूस आहे, ज्याच्या आयुष्यात एक गंभीर समस्या उद्भवते, अशावेळी हाच सर्वसामान्य माणूस एक असामान्य कृती करत या संकटातून मार्ग काढतो. समाजात स्त्री- पुरुषांना समान वागणूक मिळाली पाहिजे असे मानणारी ही व्यक्तीरेखा असल्याचे रणवीरने सांगितले.

Leave a Comment