51 वर्षीय व्यक्तीने सायकलिंग करत फिटनेस ट्रॅकवर तयार केली हरणाची आकृती

(Source)

ब्रिटनच्या चेल्टन्हम येथे राहणाऱ्या एंथनी हॉयटे यांनी लंडनमध्ये 9 तास सायकल चालवत आपल्या फिटनेस ट्रॅकवर हरणाची आकृती तयारी केली. 51 वर्षीय एंथनी यांनी 127 किमीचा प्रवास केला आणि असा रस्ता निवडला की जेथे रेंडियरची आकृती तयार होईल. त्यांनी या प्रवासाची सुरूवात पश्चिम लंडनच्या हॅमरस्मिथवरून केली व युस्टन येथे हा प्रवास पुर्ण केला. रेंडियर आर्कटिक आणि त्याच्या आजुबाजूच्या परिसरात आढळणारी हरणाची प्रजाती आहे.

एंथनी यांनी यासाठी एका फिटनेस अॅपचा वापर केला. एंथनी यांनी याआधी अशाप्रकारे दोन चित्र काढले आहेत. त्यांनी 2017 साली सायकलिंग करत स्नोमॅन तयार केला होता. 2018 मध्ये बर्मिंघम शहरात 141 किमी सायकलद्वारे सांता क्लॉजची कलाकृती तयार केली होती. ते दर वर्षी वर्षाच्या अखेर एक चित्र बनविण्याचा प्रयत्न करतात.

एंथनी यांनी मागील दोन चित्रांच्या तुलनेत रेंडियर चित्र सर्वात चांगले असल्याचे सांगितले. हे चित्र तयार करण्यासाठी ते आधी उत्तरेला एडगवेअरला गेले. त्यानंतर दक्षिणेला गेल व तसेच पुर्वेला हॅम्पस्टीड हीथच्या जंगलातून प्रवास केला. अखेर दक्षिणेला किलबर्न आमि मॅडा व्हेलवरून युस्टन येथे प्रवास संपवला.

Leave a Comment