निर्भया प्रकरणातील दोषीची फाशीपासून वाचण्यासाठी अजब विनंती


नवी दिल्ली : तेलंगणा पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर केल्यानंतर, देशभरातून दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फासावर कधी लटकावणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता लवकरच निर्भयाच्या सर्व दोषींना फासावर लटकवण्यात येणार असून त्यानुसार हालचाली देखील सुरु झाल्या आहेत.

16 डिसेंबर रोजीच निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील चारही दोषींना फासावर लटकवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह सचिव कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यातच आता निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयने फाशीच्या शिक्षेवर फेरविचार करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. त्याने या याचिकेच्या माध्यमातून फाशी न देण्याबाबत अजब मागणी न्यायालयाकडे केली आहे.

दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून येथील पाणीही विषारी झाले असल्यामुळे आयुष्य आधीच कमी होत आहे. अशातच फाशी देऊन माझे आयुष्य का कमी करत आहात?; असा प्रश्न निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयने उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्याने यासाठी त्याने वेद, पुराण, उपनिषद यांसारख्या ग्रंथांचाही हवाला दिली आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, सतयुग आणि त्रेतायुगात लोक हजारो वर्ष जगू शकत होती. पण कलियुगात माणूस जेमतेम 50 वर्षच जगतो. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची गरज काय? असा अजब दावा त्याने केला आहे. दरम्यान, न्यायालयाने आधीच याप्रकरणातील इतर तीन जणांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

महात्मा गांधींचाही हवाला वकील ए.पी सिंह यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये देण्यात आला आहे. म्हटले गेले आहे की, महात्मा गांधी असे म्हणत असत की, एखादा निर्णय घेताना जर कोणतीही शंका असेल तर समाजातील सर्वात गरिब व्यक्तीचा चेहरा आठवून विचार करा की, या निर्णयामुळे त्याला कोणता फायदा होणार आहे का?, तुमची शंका दूर होईल. मला फाशी दिल्याने कोणालाही काहीच फायदा होणार नाही.

Leave a Comment