… म्हणून गोलंदाजाने संधी असताना देखील फलंदाजाला केले नाही रन आउट

(Source)

कोणत्याही खेळात खेळाप्रती प्रेम आणि खिलाडूवृत्ती असणे गरजेचे असते. मैदानावर आपण अनेकदा खेळाडूंना शिवीगाळ करताना, भांडताना पाहत असतो. मात्र श्रीलंकेच्या एका गोलंदाजाने आपल्या खिलाडीवृत्तीने सर्वांचेच मन जिंकले आहे.

Mzansi Super League दरम्यान श्रीलकेंचा वेगवान गोलंदाज इसुरू उडानाने दुखापतग्रस्त मार्को मॅरिसला रनआउट करणे टाळले. लीगमध्ये पार्ल रॉक्स संघाकडून खेळत असताना इसुरू उडाना 19 व्या षटकात गोलंदाजी करत होता. यावेळी विरुद्ध संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडूत 28 धावांची गरज होती.

स्ट्राईकवर असलेल्या हेईनो क्हुनने मारले जोरदार फटका थेट नॉन स्ट्राईकवर असलेल्या मार्कोला लागतो. यावेळी उडानाकडे नॉन स्ट्राईकवर असलेल्या मार्कोला रनआउट करण्याची संधी असते. मात्र खेळ भावना दाखवत उडाना त्याला बाद करत नाही.

या घटनेचा व्हिडीओ मंझासी सुपर लीगने ट्विटरवर शेअर केला. व्हिडीओ शेअर करताना त्यांना उडानाचे कौतूक करत लिहिले की, स्पिरीट ऑफ क्रिकेट.

नेटकऱ्यांकडून देखील उडानाच्या या खिलाडूवृत्तीचे कौतूक केले जात आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पार्ल रॉक्सच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 168 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेल्सन मंडेला बेय जाइंटस संघ 156 धावांपर्यंतच मजलू मारू शकला व त्यांना 12 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

Leave a Comment