जगातील सर्वात तरूण पंतप्रधान सना मरीन यांच्याविषयी जाणून घ्या खास गोष्टी

(Source)

फिनलँडच्या सना मरीन या जगातील सर्वात तरूण पंतप्रधान बनल्या आहेत. केवळ 34 व्या वर्षी त्यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. मरीन यांनी वयाच्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. या 12 वर्षात त्यांनी पहिल्या निवडणुकीत हार ते देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्याचा प्रवास केला आहे. मात्र हे एवढे सोप नव्हते. मरीन यांच्यानुसार, त्यांना लहानपणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्या लेस्बियन जोडप्याची एकमेव मुलगी होत्या. लहानपणीच त्यांच्या आई वेगवेगळ्या झाल्या व तेथूनच अडचणी सुरू झाल्या.

त्यानंतर मरीन हेलसिंकी वरून पर्कला शहरात आल्या. त्यांना खर्चासाठी व शिक्षणासाठी नोकरी करावी लागली. मरीन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, त्यांनी पहिली नोकरी 15 वर्षांच्या वयात एका बेकरी कंपनीत केली. हायस्कूलमध्ये गेल्यावर मॅग्झिन देखील वाटल्या. ग्रॅज्युएशननंतर काहीवर्ष दुकानात कॅशियर म्हणून काम केले. याचबरोबर टॅम्पीर युनिवर्सिटीत शिक्षण घेत असताना सेल्समन म्हणून देखील काम केले.

मरीन यांनी कधीच आपल्या शिक्षणासाठी पैसे घेतले नाही. कारण त्यांना विश्वास नव्हता की, त्या परत करू शकतील की नाही.

मरीन यांनी सोशल डेमोक्रेटिक पार्टीला 120 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने परिवहन आणि संचारमंत्री म्हणून पॅनेल डिस्कशनमध्ये भाग घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, आठवड्यातून 4 दिवस आणि सहा तास काम असायला हवे. हाच जगातील पुढील ट्रेंड असेल. प्रत्येक दिवशी 8 तास काम करण्याऐवजी अधिक वेळ कुटूंबाबरोबर घालवणे गरजेचे आहे.

मरीन यांच्यानुसार, शिक्षणात त्या खूप यशस्वी नव्हत्या. मात्र शाळेच्या बाहेर डान्स, खेळ आण कुत्र्यांना सांभाळणे हे त्यांच्या आवडीचे काम होते.

फिनलँडमध्ये एखाद्या महिलेचे पंतप्रधान बनणे नवीन गोष्ट नाही. मात्र कमी वयात राजकारणात येण्याचा ट्रेंड मरीन यांच्यासोबत सुरू झाला आहे. मरीन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेसाठी चार अन्य पक्षांचा एक सेंटर लेफ्ट आघाडी तयार करण्यात आली आहे. याचे नेतृत्व देखील महिलांकडेच आहे. म्हणजेच फिनलँडचे नेतृत्व 5 महिलांच्या हातात असेल. यामध्ये सना मरीन, ली एंडरसन, कत्री कुलमूनी आणि मारिया ओहिसालो या चार महिलांचे सरासरी वय हे 33 वर्ष आहे.

Leave a Comment