आता भाजपच्या महत्वाकांक्षी मुंबई-पुणे हायपरलूपलाही स्थगिती?


मुंबई – सत्तेत आधी असलेल्या भाजप सरकारने मुंबई-पुणे हायपरलूपला जुलै २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीत पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. पण या प्रकल्पाचा फेरविचार करण्याच्या तयारीत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असल्यामुळे आता ठाकरे सरकार मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पालाही स्थगिती देण्याचे सध्या चित्र आहे. स्थगितीबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. पण ही शक्यता देखील नाकारता येत नाही. व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन हे याच सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

जेव्हा आरे कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला, तेव्हा भाजपने त्यांच्या या निर्णयावर कडाडून टीका केली. विकासकामांना खिळ बसवणारे निर्णय उद्धव ठाकरे घेत असल्याची टीका भाजपने केली. पण तरी देखील हा निर्णय झाला. आता हायपरलूप या प्रकल्पाचाही फेरविचार होण्याची चिन्ह असल्यामुळे या पार्श्वभूमीवर व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या (१२ डिसेंबरला) भेट घेणार आहेत. या प्रकल्पाची माहिती त्यांना देणार आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरे यांना काही शंका असतील किंवा त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांचीही उत्तरे ते आपल्या परीने देतील आणि हा प्रकल्प स्थगित होऊ नये यासाठी प्रयत्न करतील असे देखील वृत्त आहे.

Leave a Comment