नेटफ्लिक्सच्या नवीन प्लॅनमध्ये द्यावे लागणार 50 टक्के कमी पैसे

(Source)

स्ट्रिमिंग सर्विस नेटफ्लिक्स आता भारतात खूपच लोकप्रिय झाले आहे. नेटफ्लिक्सने काही महिन्यांपुर्वीच भारतात मोबाईल प्लॅन लाँच केला होता. आता कंपनी लवकरच नवीन स्वस्त प्लॅन लाँच करू शकते.

रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स लाँग टर्म प्लॅन्सवर काम करत आहे. हे प्लॅन तीन महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांचे असतील. याची टेस्टिंग सुरू आहे. काही ठराविक युजर्सच्या मोबाईलवर हे प्लॅन मिळत आहेत.

नेटफ्लिक्सच्या या लाँग टर्म प्लॅनमध्ये तुमचे 20 ते 50 टक्के पैसे वाचतील. नेटफ्लिक्सचा सध्या मोबाईल प्लॅन दर महिन्यासाठी 199 रुपयांपासून सुरू होतो.

नेटफ्लिक्सचे नवीन प्लॅन 1,919 पासून सुरू होऊ शकतात. तीन महिन्यांच्या प्लॅनसाठी 1,919 रुपये, 6 महिन्यांसाठी 3,359 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 4,799 रुपये असतील. सध्याच्या तुलनेत हे प्लॅन 50 टक्क्यांनी स्वस्त आहेत.

Leave a Comment