सोशल मीडिया करत आहे त्या मातेला सलाम


नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर मिझोरममधील एका व्हॉलीबॉल खेळाडूने सामन्या दरम्यान आपल्या मुलाला स्तनपान करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो निंगलुन हंगल नावाच्या एका फेसबूक युजरने शेअर केला आहे. तर हा फोटो सर्वात प्रथम लिंडा छछुवक हिने शेअर केला. लिंडाचे नाव या सोशल मीडिया पोस्टमध्ये सोर्समध्ये देण्यात आले आहे.

आपल्या ७ महिन्याच्या मुलासह खेळाडूंच्या शिबिरात टीकुम व्हॉलीबॉल टीमची महिला खेळाडून ललवेंटुलांगी हिने आपले नाव दाखल केले. या शिबिरात एका खेळाडूसह ती आपल्या आई होण्याचेही कर्तव्य बजावताना दिसत होती. ललवेंटुलांगीने चालू सामन्या दरम्यान एक ब्रेक असताना आपल्या मुलाला स्तनपान केल्याबद्दल तिचे आता कौतुक होत आहे.

लोक तिला तिची चिकाटी, समर्पण आणि खेळाप्रति असलेली पॅशन यामुळे सलाम करत आहेत. ती दोन जबाबदाऱ्या या ठिकाणी पार पाडताना दिसत आहे. या फोटोवर लोकांनी छान प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडिया पोस्ट नुसार मिझोरमचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांनी या फोटोने प्रभावित होऊन या महिला खेळाडूला १० हजार रूपयांचे बक्षिस देण्याचा निर्णय केला आहे.

Leave a Comment