लवकरच भारतात लाँच होणार 3 कोटींची शानदार कार

(Source)

लेक्ससची प्रिमियम कार एलसी500एच कॉप भारतात एंट्री करण्यासाठी तयार आहे. या प्रिमियम कारची भारतातील किंमत 2.80 कोटीच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.

(Source)

या कारची टक्कर जॅग्युआरच्या एफ-टाइप 2.0 आणि ऑडी आरएस5 कॉपशी असेल. किंमतीच्या बाबतीत Lexus LC500h या दोन्ही कारपेक्षा महाग आहे. जॅग्युआर एफ-टाइप 2.0 ची भारतीय बाजारातील किंमत 1.18 ते 1.21 कोटींपर्यंत आहे. तर ऑडी Rs5 Coupe ची किंमत 1.37 कोटी आहे.

(Source)

लेक्सस लवकरच LC500h ही कार भारतीय बाजारात सादर करणार आहे. या कारची डिलिव्हरी पुढील वर्षी मार्चपासून सुरू होईल. भारतात याच्या फेसलिफ्ट मॉडेलची विक्री होईल. हे मॉडेल कंपनीने 2018 साली सादर केले होते. लेक्ससची टू-सीटर लग्झरी कॉप एक स्पोर्ट्स कार पेक्षा एक ग्रँड टूरर कार आहे. LC500h ला भारतात हायब्रिड पॉवरट्रेन सोबत आणण्यात आले आहे. जे 477 एचपीची पॉवर देते.

(Source)

आंतरराष्ट्रीय बाजारात याच्या 5 लीटर सिलेंडर इंजिन असलेल्या मॉडेलची विक्री होते. भारतात ज्या मॉडेलची विक्री होईल त्यात 3.6 लीटरचे व्ही6 पेट्रोल इंजिन असेल. याचे इंजिन 300 एचपी पॉवर आणि 348 एनएम टॉर्क जनरेट करेल. यामध्ये CVT सोबतच 4 स्पीड ट्रांसमिशन मॅन्युअल मोडमध्ये एकूण 10 गिअर्सचा पर्याय मिळेल.

(Source)

या फीचर्सबद्दल सांगायचे तर यात तुम्हाला 10.3 इंच इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. ज्याला तुम्ही गिअर लिव्हरच्या वरती देण्यात आलेल्या टचपॅडने कंट्रोल करू शकता. याशिवाय तुम्हाला यात डिजिटल इंस्ट्रुमेंट कलस्टरसोबतच 10 प्रकारे अडजस्टेबल होणारी पॉवर ड्रायव्हर सीट मिळेल. याचा स्पेसियस ब्राइट इंटेरियर आणि अग्रेसिव्ह बोल्ड लूक ग्राहकांना नक्की आवडेल.

Leave a Comment