एकेकाळी बुट पॉलिश करणारा हा व्यक्ती आज आहे इमरान हाश्मीच्या चित्रपटातील गायक

(Source)

इंडियन आइडल एक असा रियालिटी शो आहे, जो कोणाचेही आयुष्य बदलू शकतो. या शोमुळे एखाद्या नवीन ओळख मिळते. असेच एक उदाहरण आहे सनी हिंदुस्तानी. जो यंदाच्या सीझनमध्ये इंडियन आइडलचा स्पर्धक आहे. आपल्या गायकीमुळे त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. तो नुसरत फतेह अली खान यांची कव्वाली तर अगदी सुंदररित्या गातो.

आता सनीच्या गायनावर खूष होऊन त्याला एका चित्रपटासाठी गाणे गाण्याची संधी मिळाली आहे. सनीने इमरान हाश्मीचा नवीन चित्रपट ‘द बॉडी’साठी गाणे गायले आहे. त्याने ‘रोम रोम’ नावाच्या गाण्याला आवाज दिला आहे.

सनीला ही संधी या शोमधील परिक्षक विशाल ददलानीमुळे मिळाली. एवढी मोठी संधी मिळाल्याने सनी देखील भावूक झाला. त्याने कधी विचारही केला नव्हता की, चित्रपटात गाण्याची संधी मिळेल. तो सांगतो की, इंडियन आइडल आणि विशाल ददलानी सरांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. कारण त्यांच्यामुळेच माझे चित्रपटात गाणे गायचे स्वप्न पुर्ण झाले. मी कधी चित्रपटात गाणे गाण्याचा विचार नव्हता केला मात्र या शोमुळे स्वप्न पुर्ण झाले.

सनी एका गरीब कुटूंबातून येतो. लहानपणी त्याला बुट पॉलिश देखील करावे लागत असे. मात्र आज आपल्या मेहनतीमुळे सनी प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. आपल्या आवाजाद्वारे तो पुर्ण देशाला वेडे करत आहे.

Leave a Comment