फेक वेबसाईटवर गेल्यावर आता गुगल करणार युजरला अलर्ट

(Source)

दिग्गज टेक कंपनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका नवीन फीचरबद्दल माहिती दिली आहे. गुगल क्रोमसाठी एक प्रोटेक्शन फीचर जारी करण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या नवीन फीचरमुळे युजर कोणत्याही मालवेअर प्रभावित वेबसाइटवर जाताच, ब्राउजरकडून त्यांना रियल-टाइम अलर्ट केले जाईल.

पिचाई यांनी पुढे लिहिले की,  मालवेअरने प्रभावित वेबसाइटवर जाताच युजरला माहिती दिली जाईल आणि डेस्कटॉपच्या रिअल टाइमसाठी फिशिंग प्रोटेक्शनला वाढवण्यात येईल. फिशिंग हे एक सोशल इंजिनिअरिंग अटॅक आहे. ज्याचा वापर सर्वसाधारणपणे युजर्सचा डेटा चोरी करण्यासाठी केला जातो. या डेटामध्ये युजरचे लॉग इन क्रेडिंशियल आणि क्रेडिट कार्ड नंबर या गोष्टींचा समावेश असतो.

गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, या टेक्निकला पासवर्ड चेकअप एक्सटेंशन म्हणून सादर करण्यात आले होते. ऑक्टोंबरमध्ये हे गुगल अकाउंटमध्ये पासवर्ड तपासण्याचा एक भाग होते. याद्वारे तुम्ही पासवर्ड कधीही स्कॅन करू शकता. याला क्रोममध्ये ब्राउज करण्या सोबतच चेतावणी देण्यासाठी वापर केला जाईल. गुगलने दावा केला आहे की, दररोज 4 बिलियन युजर्सला मालवेअर प्रभावित वेबसाईटवर गेल्यास चेतावणी देण्यात येते.

Leave a Comment