तुर्तास तरी कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही


मुंबई – ४० ते ४२ वर्षाचा अनुभव असलेला कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये असावा, असे कुठल्याही पक्षाला वाटते. तसे त्यांना वाटणे स्वाभाविक देखील आहे. पण मी नाराज नसून मुनगंटीवार, तावडे माझी मनधरणी करण्यासाठी आले यामध्ये काहीही तथ्य नाही. भेटण्यास आल्यावर साधारण राजकीय चर्चा होते. तुर्तास तरी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

गोपीनाथ मुंडेंचे स्मारक औरंगाबादमध्ये करावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली. तसेच १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर उद्धव ठाकरेंनी स्वतः येऊन स्मारकाबाबत घोषणा करावी, अशी विनंती देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी प्राधन्याने निधी देईल. त्याचबरोबर औरंगाबाद दौरा झाल्यावर स्मारकासाठीच्या जागेला भेट देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले. पण भाजपने ५ वर्षात गोपीनाथ मुंडेंचे स्मारक बांधलेच नसल्याचे म्हणत त्यांनी पुन्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आमची काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी जवळीक असल्यामुळे भेटीगाठी होत असतात. त्यामध्ये कधी राजकीय चर्चा होत असल्याचे खडसे म्हणाले.

Leave a Comment