या हिऱ्याच्या खाणीत ज्याला जे सापडले ते त्याच्याच मालकीचे होते

(Source)

जगभरात शेकडो हिऱ्याच्या खाणी आहेत. जेथून मोठ्या संख्येत हिरे काढले जातात. यामुळे अनेक डायमंड कंपन्या श्रीमंत झाल्या आहेत. मात्र जगात अशीही एक हिऱ्याची खाण आहे, जेथे कोणीही सर्व सामान्य व्यक्ती हिरा शोधू शकतो. येथे ज्या व्यक्तीला हिरा सापडतो, तो त्याच्या मालकीचा असतो.

(Source)

ही खाण अमेरिकेच्या अरकांसास राज्यातील पाइक काउंटी मरफ्रेसबोरो येथे आहे. येथील अरकांसास नॅशनल पार्कमधील 37.5 एकर शेतीत हिरे सापडतात. येथे 1906 पासून हिरे सापडतात. यामुळे याला ‘द क्रेटर ऑफ डायमंड्रस’ देखील म्हणतात.

(Source)

1906 मध्ये जॉन हडलेस्टोन नावाच्या एका व्यक्तीला येथे दोन चमकणारे क्रिस्टल सापडले होते. जेव्हा त्यांनी याचा तपास केला तेव्हा ते हिरे असल्याचे समजले. त्यानंतर जॉन यांनी आपली 243 एकर जमीन डायमंड कंपनीला विकली.

(Source)

वर्ष 1972 मध्ये डायमंड कंपनीद्वारे खरेदी केलेली जमीन नॅशनल पार्कमध्ये आली. यानंतर अरकांसास डिपार्टमेंट ऑफ पार्क अँन्ड टूरिझ्मने कंपनीकडून ही जमीन खरेदी केली व ही जागा सर्व सामान्य लोकांसाठी उघडली. या जागेवर हिरा शोधण्यासाठी लोकांना एक फी द्यावी लागते.

(Source)

या शेतात लोकांना आतापर्यंत हजारो हिरे सापडले आहेत. नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनुसार, 1972 पासून आतापर्यंत या ठिकाणी 30 हजारांपेक्षा अधिक हिरे सापडले आहेत.  अंकल सॅम नावाचा हिरा देखील येथेच सापडला होता. जो 40 कॅरेटचा होता. हा अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा आहे.

(Source)

येथे सर्वसाधारणपणे 4 ते 5 कॅरेटचे हिरे सापडतात. येथे लोक मोठ्या संख्येने हिरे शोधण्यासाठी येतात.

Leave a Comment