जगाच्या नकाशावर दिसणार नवा देश, जाणून घ्या त्याविषयी खास गोष्टी

(Source)

जगाच्या नकाशावर आता आणखी एक नवीन देश अस्तित्वात येणार आहे. हा देश पापुआ न्यू गिनी या देशापासून वेगळा होऊन निर्माण झाला आहे. या देशाचे नाव ‘बोगेनविले’ असे आहे.

बोगेनविले या देशाविषयी काही खास गोष्टी –

– बुका आयलंडवरील बुका शहर हे या नवीन देशाची राजधानी आहे. येथेच सरकारी हेडक्वार्टर असतील.

– या भागात जवळपास 3 लाख लोक राहतात. येथील सर्व गावे बुका आणि दोन मुख्य शहर अरावा आणि बुईन यांच्या आजुबाजूला आहेत. 2011 च्या जनगणनेत येथील लोकसंख्या 249,358 होती.

– मतदानासाठी तब्बल 2 लाख लोकांची नोंदणी करण्यात आली होती.

– येथे राहणारी लोक प्रामुख्याने मेलेनेशियन भागातील आहेत व येथील स्थानिक भाषा टॉक पिसिन आहे. याशिवाय इतर 19 भाषा येथे बोलल्या जातात.

– बोगेनविले आयलंडचे नाव हे फ्रेंच नाविक लुईस एंटोनी डे बोगेनविले याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्यानेच 1768 मध्ये याचा शोध लावला होता.

– 19 व्या शतकात येथे जर्मनीची सत्ता होती. द्वितीय विश्व युद्धादरम्यान हे जापानचे मिलिट्री बेस होते. त्यानंतर 1975 ला पोपुआन न्यू गिनीला स्वातंत्र्य मिळेपर्यंत येथील कामगाज ऑस्ट्रेलिया पाहत असे.

– बोगेनविले कॉपर लिमिटेडकडून 1969 मध्ये येथे मोठी तांब्यांची खाण सुरू करण्यात आली.

– या खाणीतून मिळणाऱ्या नफ्याच्या वाट्यामुळे गृह युद्धाची परिस्थिती निर्माण झाली व खाण कंपनी रिओ टिंटोला 1989 ला खाणीवरील मालकी हक्क गमवावा लागला. त्यावेळी पोपुआ न्यू गिनीमध्ये जगातील 7 टक्के तांब्याचे उत्पादन होत असे.

– बोगेनविलेचे बंडखोर सैन्य आणि पापुआ न्यू गिनीच्या सैन्याच्या या गृहयुद्धात जवळपास 20 हजार जणांना प्राण गमवावे लागले. हा संघर्ष 1998 ला संपला.

आता स्वातंत्र्यानंतर बोगेनविले स्वतःला आर्थिक दृष्ट्या कसे सिद्ध करणार हा प्रश्न आहे. कारण पापुआ न्यू गिनीचे उपराष्ट्रपती रेमंड मासोनो म्हणाले आहेत की, ते या क्षेत्रातील खाणकामांचे नियम बदलणार आहेत.

Leave a Comment