एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी इतके कोटी रुपये घेतात बॉलीवूड सेलिब्रेटी


सर्वसामान्यपणे आपल्या सर्वांना बॉलीवूडच्या कलाकारांच्या कमाई स्रोत चित्रपट आणि जाहिरात एवढे असल्याचे आपल्याला माहित असते. पण सध्याच्या घडीला हे कलाकार आणखी एका स्रोतच्या माध्यमातून बक्कळ कमाई करत आहेत. सोशल मीडियावरील प्रसिद्ध माध्यम असलेल्या इंस्टाग्रामच्या एका पोस्टच्या माध्यमातून हे कलाकार कोट्यावधी रुपये कमावत आहेत. तिच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.


सोशल मीडियावर बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन खूप सक्रिय असतात. एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी ते 40-50 लाख रुपये मानधन घेतात. अमिताभ बच्चन सर्वात जास्त ट्विटरवर सक्रिय असतात.


फक्त इन्स्टाग्रामच नाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या आलिया भट्टने तर स्वतःचे युट्यूब चॅनल देखील सुरू केले आहे. इंस्टाग्रामच्या एका पोस्टसाठी ती 1 कोटी रुपये घेते.


मागच्या काही काळापासून अभिनेता शाहरुख खान चित्रपटांपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर त्याच्या कॅलिफोर्निया व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले होते. एका पोस्टसाठी शाहरुख 80 लाख ते 1 कोटी रुपये घेतो.


शाहिद कपूरच्या चाहत्यांमध्ये कबीर सिंह चित्रपटानंतर वाढ झाली. त्याच्याकडे अनेक निर्मात्यांची रांग लागली आहे. एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी शाहिद 20 ते 30 लाख रुपये घेतो.


गरोदरपणामुळे अभिनेत्री नेहा धुपिया सिनेसृष्टीपासून दूर असली तरी देखील ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर असंख्य चाहते आहेत. एका पोस्टसाठी ती 1.5 लाख रुपये चार्ज करते.

View this post on Instagram

My everything ❤️ #karwachauth

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


इन्स्टाग्रामवर अभिनेत्री प्रियंका चोप्रा-जोनासचे 40 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी ती 1.87 कोटी रुपये घेते.

Leave a Comment