बीएमडब्ल्यूच्या कार पेक्षाही महागडा आहे अ‍ॅपलचा नवीन मॅक प्रो

(Source)

अ‍ॅपल मॅक प्रो डेस्कटॉप कॉम्प्यूटरचे टॉप एंड व्हर्जन आता खरेदी करता येणार आहे. मात्र विशेष म्हणजे हे व्हर्जन बीएमडब्ल्यू कारपेक्षा ही महाग आहे. जून महिन्यात कंपनीने याची घोषणा केली होती. अमेरिकेत नवीन मॅक प्रो आणि प्रो डिस्प्ले एक्सडीआरची प्री बुकिंग सुरू झाली आहे. नवीन मॅक प्रोची सुरूवाती किंमत 5,999 डॉलर (4,25,000 रुपये) आणि प्रो डिस्प्ले एक्सडीआरची किंमत 4,999 डॉलर (3,54,000 रुपये) पासून सुरू आहे.

(Source)

जर तुम्ही अ‍ॅपलचे टॉप अपग्रेटेड व्हर्जन ज्यात 28 कोर इंटेल जिऑन प्रोसेसर, 1.5 टेराबाइट ईसीसी रॅम, 4 टेराबाइट SSD स्टोरेज, एएमीडी रेडॉन प्रो वेगा 2 डुओ ग्राफिक्स 64GB HBM2 मेमरी आहे, ते खरेदी करायचे असेल तर त्या व्हर्जनची किंमत 50,199 डॉलर (जवळपास 35,50,000 रुपये) आहे. याशिवाय जर तुम्ही प्रो डिस्प्ले एक्सडीआर आणि मॉनिटरसाठी स्टँड घेण्याचा विचार करत असाल, तर यासाठी तुम्हाला अतिरिक्त 6,998 डॉलर (4,95,000 रुपये) द्यावे लागतील.

मॅक प्रो च्या सुरूवाती व्हेरिएंटमध्ये 32 जीबी मेमरी, ऑक्टा-कोर इंटेल जिऑन सीपीयू, रेडियन प्रो 580एक्स ग्राफिक्स आणि 256 जीबी एसएसडी स्टोरेज मिळेल. या व्हेरिएंटची किंमत 5,999 डॉलर आहे.

अ‍ॅपलचे हे नवीन मॅक प्रो मशीन सर्वसाधारण मॅकच्या तुलनेत 15000 पट अधिक फास्ट आहे. या मॅक प्रोची निर्मिती करण्यासाठी कंपनीने 200 मिलियन डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.

Leave a Comment