या व्यक्तीने चक्क वयाच्या 91 व्या वर्षी मिळवला डिप्लोमा

(Source)

शिक्षणाला वयाचे बंधन नसते असे म्हटले जाते. न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीने हे खरे करून दाखवले आहे. क्लिफर्ड हॅन्सन यांचे वयाच्या 91 व्या वर्षी शिक्षण पुर्ण करण्याचे स्वप्न साकार झाले आहे. त्यांना वयाच्या 91 व्या वर्षी हायस्कूलमधून डिप्लोमा घेतला आहे. हॅन्सन यांनी 1930 मध्ये कुटूंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण अर्ध्यातून सोडले होते. डिप्लोमा घेतल्यानंतर ते म्हणाले की, आज मला स्वतःचा अभिमान वाटत आहे.

हॅन्सन यांनी सांगितले की, 1930 मध्ये त्यांचे वडील खूप आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना शिक्षण किंवा घराची पारंपारिक शेती याविषयी एक गोष्ट निवडायची होती. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी शेतीला निवडले.

त्यांनी सांगितेल की, जेव्हा तुम्ही शेती करता त्यावेळी तुमचा 98 टक्के वेळ त्यासाठी द्यावा लागतो. तुम्ही त्यासोबत दुसरे काम करू शकत नाही. त्यामुळे मी कधी शिक्षणाबद्दल विचार करू शकलो नाही व आठवीतूनच शिक्षण सोडले.

त्यांनी पुढे सांगितले की, डिप्लोमा पुर्ण करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांनी रात्रीचा देखील अभ्यास केला.

Leave a Comment