भाड्याचे घर पाहण्यासाठी 12 तासात तब्बल 1750 लोकांनी केली गर्दी

(Source)

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये घराच्या वाढत्या भाड्यामुळे लोक वैतागले आहेत. अशा परिस्थितीत काही दिवसांपुर्वी एका अपार्टमेंटसाठी महिन्याला 550 युरो (जवळपास 43 हजार रूपये) भाड्याची जाहिरात दिसली, तेव्हा 12 तासात तब्बल 1750 लोक हे घर पाहण्यासाठी आले.

बर्लिनच्या शॉनबर्ज भागात 1950 मध्ये बनलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर 54 वर्गमीटर क्षेत्रातील या घरात दोन खोल्या आणि बाल्कनी भाड्याने देण्याची जाहिरात देण्यात आली होती.

सर्वसाधारणपणे या भागातील घराचे भाडे हे 850 यूरो (66,500 रुपये) ते 1400 यूरो (1 लाख 9 हजार रुपये) पर्यंत जाते. त्यामुळे केवळ 550 यूरोमध्ये मिळणारे घर पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली.

रियल एस्टेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घर बघण्यासाठी आलेल्या लोकांकडे पाहून असे वाटत होते की जसे काही एखादा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व लोकांना रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आले. एका मेगाफोनद्वारे अनाउंसमेंट करत त्यांना घर पाहण्यासाठी सोडण्यात आले. एकावेळे 30 जणांचा ग्रुप घर पाहण्यासाठी गेले.

प्रॉपर्टी मॅनेजर रॉफ हार्मसने सांगितले की, आमच्या जवळ जे अर्ज आले आहेत, त्यातून निर्णय घेऊन लवकरच घर कोणाला मिळाले याची घोषणा केली जाईल.

Leave a Comment